... तर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर होणार जप्त

24 डिसेंबर ची मुदत दिली आहे. या मुदतीत सरकारने याबाबत निर्णय जाहीर न केल्यास मराठा आंदोलन मुंबई कडे कुच करून मुंबई जाम करतील,


मराठा आंदोलक : सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास मराठा आंदोलक मुंबई जाम करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे,

आता ही मुदत संपत आल्याने सरकार देखील अलर्ट मोडवर येऊन चर्चा करत आहे. मात्र चर्चेत अपेक्षित यश येत नसल्याचे मराठा आंदोलकांना वाटल्यास मुंबईत आंदोलनाचा निर्णय होऊ शकतो. पोलिसांच्या गोपनीय माहितीनुसार 24 डिसेंबर नंतर मुंबईत आंदोलन झालेच, तर यामध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलन जमा होण्याची शक्यता आहे. ते राज्याच्या विविध भागातून ट्रॅक्टरचा इतर व अनेक घेऊन मुंबईकडे जाण्याची शक्यता आहे. राज्याचे विविध भागातून ट्रॅक्टर सारखी वाणी मुंबईकडे निघाल्यास गर्दी वाढवून वाहतुकी अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच लाखोंची गर्दी जमून त्यांच्याकडून शांततेचा भंग होण्याची शक्यता वाढते. यातून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

  ट्रॅक्टर मालकांना आंदोलनात ट्रॅक्टर न आणण्याचे नोटीस देण्यात आले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, शेतकऱ्याकडे असलेले ट्रॅक्टर हे शेती उपयुक्त कामासाठीच आहेत, त्यांचा वापर शेतीच्या कामासाठीच करावा. ट्रॅक्टर धारक शेतकऱ्याकडे कोणीही आंदोलन नेते किंवा कार्यकर्ते ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आल्या शेतकऱ्यांनी त्यांना आपले ट्रॅक्टर देऊ नयेत किंवा स्वतः ट्रॅक्टर सोबत जाऊ नये. जर या शेतकऱ्यांनी मराठा आंदोलकांना ट्रॅक्टर दिल्यास किंवा स्वतः ट्रॅक्टर घेऊन गेल्यास आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या प्रकरणी संबंधित ट्रॅक्टर धारक शेतकऱ्याला जबाबदार म्हणून त्यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल होईल तसेच ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments