पिक विमा काढणाऱ्यांना मिळणार लाभ :
तालुका कृषी अधिकारी टक्के यांची माहित...
👇🏻
https://chat.whatsapp.com/HgLOy2eyEI9EH53LdnKFoG
वैजापूर तालुका : जुलै, ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानी पोटी वैजापूर तालुक्यातील एक लाख २० हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने तब्बल ४६ कोटी ६९ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी दिली.
भर पावसाळ्यात दीर्घ पावसाचा खंड पडल्यामुळे वैजापूर तालुक्यातील दहा महसूल मंडळामध्ये खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कृषी विभागामार्फत तसा अहवाल विमा कंपनी सादर केला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या सूचनानुसार ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या.
चोलामंडलम विमा कंपनी व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे दहा महसूल मंडळांमध्ये खरीप पिकाचे पंचनामे करून विमा कंपनी सादर केले होते. यावरून विमा कंपनीने तालुक्यातील एक लाख वीस हजार ४६९ शेतकऱ्यांना ४६ कोटी ६९ लाख ७७ हजार ५१८ रुपयांचा अग्रीम मंजूर केले असल्याचे कृषी अधिकारी ठक्के यांनी सांगितले. यामुळे इन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
0 Comments
Please inter you experience to my post