छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यात गुन्हे दाखल झालेल्या अंबादास मानकापेच्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही कर्ज प्रकरणात ४८ कोटी ८५ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार लेखापरीक्षक अनिल भोमावत यांनी दिली आहे. त्यावरून वेदांत्नगर पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष, संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भोमावात यांनी १ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत लेखापरीक्षण केले आहे. यात ओम कन्ट्रक्शन ( १६,८३,१७७ ),
आदर्श बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ( २० लाख ) , आदर्श ऑइल मिल ( ४ कोटी ३५ लाख १३हजार ८०९ ), समर्थ इंटरप्राईजेस ( ५ कोटी ७६ लाख २५ हजार ९६९ ), दर्श डेअरी प्रोडक्ट प्रा. लि. ( ४ कोटी ९८ लाख ५१ हजार ) या कर्ज प्रकरणात अपहार झाल्याचे दिसून आले आहे. खात्यावर रक्कम नसताना, विनाकारण कर्ज वाटप केल्याचे म्हटले आहे. तसेच द्रोपती डांगे ( २ कोटी ), तुळसाबाई अंबादास मानकापे ( दीड कोटी ), अनिल अंबादास मानकापे ( २ कोटी ), कैलास लिंबाजी जाधव
( २ कोटी ), पूजा तांबे ( ५ लाख ), आरती पळसकर ( १५ लाख ) यांच्यासह आदर्श डेअरी, आदर्श बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदींना कागदपत्रांची पूर्तता न करताच कर्ज उचलून अपहार केल्याचे दिसून आले आहे
0 Comments
Please inter you experience to my post