COVID-19 Updates : गेल्या 24 तासांमध्ये करोणाचे 800 हून अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 7 महिन्याच्या एका दिवसातील रुग्णांची संख्या वाढण्याचा हा उंचांक आहे.
अश्या नवीन updates पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा 👈🏻
Corona Updates : ( Deli ) नवी दिल्ली : नववर्ष सुरू झाला आहे,( 1 जानेवारी 2024 ) पण नव्या वर्ष सोबतच करोना धाकधुकिने वाढत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या करोनाच्या रुग्णांची संख्या तब्बल 22 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 24 तासात 800 हून अधिक करोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या सात महिन्यातील एका दिवसातील रुग्णाची संख्या वाढण्याचा उंच्यांक आहे. गेल्या आठवड्यात ( 24 - 30 डिसेंबर ) भारतामध्ये कोरोनाचे 4562 नवे रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यात हा आकडा 3118 होता. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
हे देखील वाचा :
1 जानेवारीपासून या कंपनीच्या कारच्या दरात वाढ होणार : सर्वसामान्य खिशावर होणार परिणाम
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब वेरियंट JN - 1 ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत जगभरात मोठी वाढ झालेली आहे. तसेच नवीन वर्षाच्या उत्साहाबरोबरच कोरोनाची ही भीती सर्वांच्या मनात आहे. देशात गेले 24 तासातून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 841 नोंद झाली असून, सक्रिय रुग्णांची संख्या 4309 वर पोचली आहे. भारतात JN - 1 ची एकूण रुग्ण 178 आहे. राज्यात सर्वात जास्त केरळ राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या 83 नोंदण्यात आली आहे. तसेच जानेवारी 2020 पासून, तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 4,50,12,484 वर पोचली आहे. गेले 24 तासांमध्ये करोना रुग्णांमधील तीन जणांचा मृत्यू, तर गेल्या काळापासून आतापर्यंत भारतात मृत कोरोना रुग्णांची संख्या 5,33,351 वर पोचली आहे.
जगभरात पसरतो JN - 1 :
जागतिक स्तरावर यु एस किंवा युरोपीय देश, सिंगापूर आणि चीन मधील कोरोना JN - 1 रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. डब्ल्यू एच ओ मधील एका डॉक्टरांनी शनिवारी बोलताना सांगितले की, मर्यादित अहवाल देणाऱ्या देशांमधून covid - 19 हॉस्पिटलायजेशिअन मधून आणि आयसीयू मधील गेल्या महिन्याभरापासून 35 टक्क्यांनी कोरोना संख्येची वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले की, CARS-COV-2, इन्फ्ल्येंझा आणि इतर श्वसन रोगांचे प्रकरणे वाढत आहे. या संसर्गजन्य रोग पासून आपण आपले संरक्षण केले पाहिजे. मारिया एन केअरको म्हणले की , JN रोग वाढत आहे. परंतु महत्वाचे म्हणजे covid 19 चे रुग्ण सर्व देशांमध्ये वाढत आहे.
नव्या वेरियंटमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता :
कोरोना हा विषाणू वाल्यापासूनच त्याची लक्षणे वेळोवेळी बदलत आहे. तसेच दिल्लीमध्येही JN 1 चा सब वेरियंट आढळला आहे. मात्र उपचारानंतर हा रुग्ण बरा झाला आहे, तसेच येत्या दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. असे तज्ज्ञांनी म्हटले आहे, पण दिलासा देण्याची बाब आहे की कोरोना विषाणूचे हे लक्षणे मागच्या विषाणू सारखेच आहे.
JOB updates |
0 Comments
Please inter you experience to my post